दिनांक २७/७/२४ रोजी शिक्षण सप्ताह अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण विभागा मार्फत ‘ कागदी पिशवी बनवणे ‘ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन ७५ कागदी पिशव्या बनवल्या या बनवण्यासाठी त्यांना अक्षम विद्यार्थ्यांच्या विशेष शाळेतील तंज्ञ मार्गदर्शकांनी सक्रिय मार्गदर्शन केले.सदर पिशव्या विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनींनी दहा रुपये देणगी मूल्य देऊन खरेदी केल्या.यातून जमा झालेला निधी सदर शाळेतील मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी या तंज्ञ मार्गदर्शकांकडे मा.प्राचार्याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.या समयीची निवडक क्षणचित्रे