एक झाड आईच्या नावाचे’ या मोहिमेअंतर्गत आईच्या नावाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’च्या 111 व्या भागामध्ये पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावल्याचेही म्हटले.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” आपल्या सर्वांच्या जीवनात ‘आई’चा दर्जा सर्वोच्च आहे. प्रत्येक दुःख सहन करूनही आई आपल्या मुलाचे पालनपोषण करते आणि आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करते. आपल्या सर्वांवरील ऋणासारखे आहे, जे कोणीही फेडू शकत नाही.
आपण आईला काहीही देऊ शकत नाही.”हाच विचार करून एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे, या मोहिमेचे नाव आहे ‘एक झाड आईच्या नावे’.
उद्दिष्ट:- ‘एक झाड आई साठी’ उपक्रम अंतर्गत झाडे घेऊन, माता पालक सभा घेऊन झाडे देणे, वृक्षारोपण करणे, झाडे जगविणे व निगराणी राखणेचे आवाहन करावे.
स्वच्छता ही सेवा २०२४ च्या मोहिमेअंतर्गत “एक झाड आईच्या नावे” हा उपक्रम शनिवार,दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोजी ,चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आला.या उपक्रमास,कनिष्ठ महविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रशांत मोरे सर,पर्यवेक्षक श्री.अजित सोनावणे सर,पर्यवेक्षिका सौ. स्वाती पाटील मॅडम,पालक वर्ग,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या उप्रमाअंतर्गत माता पालक व त्यांच्या मुला मुलींना देशी झाडांचे (आंबा,जांभूळ, चिकू,बेल, कडूनिंब,अशोक,तुळस) वाटप करण्यात आले.कनिष्ठ महविद्यालयातर्फे या झाडांची लागवड करणे,निगराणी करणे व जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमास पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
पालकांच्या आश्वासनांनी कार्यक्रमाची सांगता झाली.